T20 WC 2024 : पंड्या, पंत चमकला; सराव लढतीत टीम इंडियाचा बांगलादेशवर मोठा विजय

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 च्या सराव लढतीत टीम इंडियाने बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला. शनिवारी न्यूयॉर्क मधील नसाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय मैदानात दोन्ही संघात सामना रंगला. या लढतीत बांगलादेश पुढे हिंदुस्थानने विजयासाठी 183 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकात 9 विकेट्स गमावून 122 धावाच करू शकला.

बांगलादेश कडून महमूदुल्लाह रियाद याने 28 चेंडूत 40 धावा केल्या, तर शाकिब अल हसन याने 34 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. इतर खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हिंदुस्थान कडून शिवम दुबे आणि अर्शदिप सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 5 विकेट गमावून 182 धावा की. ऋषभ पंत याने रिटायर्ड हर्ट होण्याआधी 32 चेंडूत 53 धावा चोपल्या. यात त्याने 4 चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. तर हार्दिक पंड्या याने 23 चेंडूत नाबाद 40 धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव याने 31, तर कर्णधार रोहित शर्मा याने 23 धावांनी खेळी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)