T-20 World Cup 2024 – अफगाणिस्तानला नमवत दक्षिण आफ्रीका अंतिम फेरीत, विजयाचे अष्टक पूर्ण

टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत डार्क हॉर्स ठरलेल्या अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला आहे.

त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडीयमवर पार पडलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासारख्या संघाला हरवल्यामुळे अफगाणिस्तानी संघाचे मनोधैर्य उंचावलेले होते तर सलग सात सामने जिंकलेला दक्षिण आफ्रिकेचा संघही फुल फॉर्मात होता. सामन्याला सुरुवात होताच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तुफान मारा केला त्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांची अक्षरश: दाणादाण उडाली. अझमतुल्लाह सोडला तर एकाही फलंदाजाला दोन अंकी आकडा गाठता आला नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 56 धावांवर तंबूल परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अफगाणिस्तानने दुसऱ्या ओव्हरमध्येच पहिला धक्का दिला. क्विंटन डी कॉक हा अवघ्या पाच धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर रीझा हेंन्ड्रिक (29) आणि एडन मारकम (23) धावा करत संघाला विजय मिळवून दिला.