T20 World Cup 2024 : Team India सेमी फायनल जिंकणार! इंग्लंडच्या माजी कर्णधारानेच वर्तवलं भाकित

टी20 वर्ल्ड कप 2024 आता अंतिम टप्प्यात आला आहे. 27 जून 2024 रोजी सेमी फायनल पार पडणार आहे. पहिला सेमी फायनल सामना अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार, तर दुसरा सेमी फायनल सामना टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये गुयानामध्ये पार पडणार आहे. या सामन्याच्या अनुषंगाने इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवुडने मोठे वक्तव्य केले आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये T20 World Cup 2024 ची दुसरी सेमीफायन पार पडणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळेच अपराजित राहिलेल्या टीम इंडियाला पराभूत करणे इंग्लंडला तितके सोपे जाणार नाही. या सामन्यावर दोन्ही देशातील चाहत्यांच्या नजरा लागूण असणार आहेत. कारण 2022 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाला 10 विकेटने हारवले होते. परंतु तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिथी वेगळी आहे. तसेच टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपमधील प्रदर्शन पाहता त्यांना सेमी फायनलमध्ये मी हारताना पाहू शकत नाही. असे पॉल कॉलिंगवुडने म्हंटले आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवुडने Star Sports Press Room या शोमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या सेमी फायनल संदर्भात भाष्य केले. “मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की यावेळी मला टीम इंडिया हारताना दिसत नाही. त्यांना पराभूत करण्यासाठी इंग्लंडला काहीतरी असामान्य कारवे लागणार आहे. बुमराह सध्या चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळेच टीम इंडिया एक उत्कृष्ट संघ म्हणून आघाडीवर आहे. बुमराह तंदुरुस्त, वेगवान, अचूक आणि अत्यंत कार्यक्षम आहे.” अस म्हणत पॉलने एकप्रकारे बुमराहच्या गोलंदाजींच कौतुक करत इंग्लंडच्या फलंदाजांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

“120 चेंडूंच्या सामन्यात, बुमराहसारख्या गोलंदाजाच्या 24 चेंडूमुळे खूप फरक पडतो. अमेरिकेतील कठीण परिस्थितीत आणि कठीण खेळपट्ट्यांवरही टीम इंडिया आत्मविश्वासाने खेळताना दिसली. तसेच रोहित शर्मासारखे त्यांचे इतर फलंदाज फॉर्ममध्ये आले असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला खेळ केला आहे.” असे पॉल कॉलिंगवुड म्हणाला आहे.