मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि जगातील एक नंबरचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये गोलंदाजांवर चांगलाच बरसताना दिसत आहे. बडोदाकडून खेळताना त्याने त्रिपुराविरुद्ध पाच खणखणीत षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 23 चेंडूंमध्ये 47 धावांची तुफान खेळी केली. त्यामुळे आगामी आयपीएलच्या दृष्टीने मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचे वातवरण आहे.
त्रिपुराविरुद्ध खेळताना हार्दिकने परवेज सुल्तानच्या एकाच षटकात 28 धावा चोपून काढल्या. हार्दिकच्या झंझावाती खेळीमुळे बडोदा संघाचा रोमहर्षक विजय झाला. त्याच बरोबर हार्दिकने तामिळनाडूविरुद्ध 69 धावांची वादळी केली होती. तसेच गुजरातविरुद्ध 74 आणि उत्तराखंडविरुद्ध 41 धावा केल्या होत्या. हार्दिक लयीत आल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे. कारण मुंबईसाठी मागचा हंगाम अत्यंत खराब राहील हातो. त्यामुळे साखळी फेरीतच बाद होण्याची नामुष्की संघावर ओढावली होती. तसेच संपूर्ण हंगामात हार्दिकला चाहत्यांनी लक्ष्य केले होते. मात्र, सय्यद मुश्ताक अली करंडकात हार्दिकची फटकेबाजी पाहून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.