मंकीपॉक्स साथीविषयी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आणीबाणीचा इशारा दिला असतानाच, आता भारतातही संशयित मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मंकीपॉक्सची साथ असलेल्या देशातून प्रवास करून आलेल्या या संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.