तर कशाला झाली असती दाटीवाटी, त्या व्हिडीओवरून सुषमा अंधारेंचा महायुतीच्या नेत्यांना टोला

सध्या सोशल मीडियावर महायुतीतील नेत्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गाडीत मागच्या सीटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन तथा ग्रामविकस मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाटीवाटीने बसल्याचे दिसून येत आहे. यावरून नेटकरी देखील या नेत्यांची फिरकी घेताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या व्हायरल व्हिडीओ वरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीतील नेत्यांना टोला लगावला आहे. सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून त्या सोबत मिंधे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. ”जर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी..’, अशा शब्दात त्यांनी मिंधे गटाची फिरकी घेतली आहे.