अजित पवारांनी सर्व हिसकावून घेतलं, सुप्रिया सुळे यांची टीका

अजिच पवार गट म्हणजे पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आता सुप्रिया सुळे यांनी ही अजित पवार यांनी हिसकावून घेतले अशी टीका केली
आहे.

कोल्हापुरातल्या एका सभेत बोलताना सुळे म्हणाल्या की, वडिलांच्या अधिकाराने मागितलं असतं तर सगळं देऊन टाकलं असतं, हेच तर बहीणीचं प्रेम त्यांना कळालं नाही. त्यांनी प्रेमाने मागायला हवं होतं हिसकावून नाही घ्यायला हवं होतं. हिसकावून घेतलं तर काही देणार नाही. बंटी दादा जे काही मागतात बहीण म्हणून मी देते. हेच तर नातं असतं बहीण भावाचं आणि हेच नातं महाराष्ट्राच्या नेत्यांना कळालं नाही असेही सुळे म्हणाल्या.