न्यायदेवतेची मूर्ती म्हटली की समोर दिसते ती डोळ्यावर काळी पट्टी हातात तराजू व दुसऱ्या हातात तलवार असलेली मूर्ती. पण आता या मूर्तीचे स्वरूप बदलले असून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन पुतळ्यामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटविण्यात आली असून आता हातात तलवारीऐवजी संविधान दिसते. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय