सुनीता अडकली; नासाची चिंता वाढली

हिंदुस्थानी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी त्यांचे सहकारी बच विल्मोर यांच्यासह अंतराळात झेप घेतली. या गगनभरारीचे जगभरातून कौतुक झाले. परंतु आता एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली. सुनीता विल्यम्स यांच्या ‘स्टारलाइनर’ यानामध्ये  तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे पृथ्वीवर परतण्यास अडचणी येत आहेत. या प्रकरणी नासाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

लवकरच  यानातील तांत्रिक अडचणी सोडवून दोघे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील, असे नासाच्या टीमने सांगितले. 6 जूनपासून सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे आहेत. ते 13 जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. मात्र काही तांत्रिकी कारणामुळे पृथ्वीवर परतणे पुढे ढकलण्यात आले. अद्यापही त्यांच्या परतीच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. त्यामुळे दोघे कधी परत येणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.