बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी याला सिनेमाच्या शुटींग दरम्यान दुखापत झाली आहे. याबाबत सुनील शेट्टी यांच्या मॅनेजरने ही माहिती दिली आहे, ‘अन्ना यांना आज अॅक्शन सीनच्या शुटींग दरम्यान दुखापत झाली आहे. ते मुंबईत सिनेमाचे शुटींग करत होते’.
सुनील शेट्टी यांच्या मॅनेजरने पुढे लिहीले की, मच अवेटेड वेब सिरीज ‘हंटर-2’ ची शुटींग करत होता. त्यावेळी अॅक्शन सीन करताना ही दुखापत झाली आहे. त्यांनी पुढे लिहीले की, या सीनमध्ये आणखी तीन अभिनेते होते. त्यात त्याला काठिने हल्ला करायचा होता. याच सीन दरम्यान त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली. त्याला तातडीने वैद्यकीय सेवा देण्यात आली आणि आता तो बरा आहे.
सुनील शेट्टीने आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर हेल्थ अपडेट दिली आहे. इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत त्याने लिहीले की, छोटीशी दुखापत आहे., काही गंभीर नाही. मी एकदम ठीक आहे आणि पुढच्या शुटींगसाठी तयार आहे. तुमचे प्रेम आणि काळजीसाठी खूप आभारी आहे, अशी पोस्ट शेअर केली आहे.