सोमवारी अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिरात प्रभू श्री राम चंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावरून भाजप नेते व माजी खासदार सुब्रमन्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
I shall now move the Supreme Court to request urgent listing my pending Places of Worship PIL to permit me to restore Gyanvapi Kashi Vishwanath Mandir and Krishna Janmabhoomi Mathura Temple. Modi will do zilch but come back to grab the credit.
— Subramanian Swamy (@Swamy39) January 23, 2024
सुब्रमन्यम स्वामी यांनी काशी विश्वनाथ मंदीर आणि कृष्ण जन्मभूमी मंदिरप्रकरणी लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. स्वामी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ” ज्ञानवापी काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्ण जन्मभूमी मथुरा मंदिर पुन्हा बांधण्याची परवानागी मिळावी यासाठी माझी ‘प्लेस ऑफ वर्शिप’ ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने लवकरच दाखल करणार आहे. या याचिका लवकरात लवकर पटलावर घ्यावी यासाठी मी पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे. त्यासाठी मोदी आताही काहीच करणार नाहीत. परंतू, नंतर श्रेय लाटण्यासाठी धावत येतील’, असा टोला स्वामी यांनी मोदींना लगावला आहे.