आठ तास ड्युटी समितीतले उपनिरीक्षक कारंडे सेवानिवृत्त

माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या कार्यकाळात पोलीस अंमलदारांसाठी आठ तासांची ड्युटी करण्यात आली होती. या ऐतिहासिक आठ तास ड्युटी समितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे उपनिरीक्षक राजकुमार कारंडे हे आज सेवानिवृत्त झाले.

देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस अंमलदार रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलीस दलातील अंमलदारांसाठी आठ तास डय़ुटीचा प्रकल्प तयार केला होता. मग पडसळगीकर हे आयुक्त असताना त्यांनी आठ तास ड्युटीसाठी एका समितीची स्थापना केली होती. त्यात उपनिरीक्षक राजकुमार कारंडे, पालवे, अंमलदार स्नेहा सावंत, युवराज पाटील, ज्योत्स्ना दांगट यांचा समितीत समावेश केला होता. या समितीने संशोधन करून आठ तास ड्युटीचा प्रकल्प तयार केला आणि मग तो लागू करण्यात आला होता.