मिंधे-भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाचा बट्टय़ाबोळ झाल्याचे प्रकार दररोज समोर येत असताना आता विद्यार्थ्यांना दिलेल्या गणवेशामध्ये एका शर्टाची बाही दुसऱयाच शर्टला तर दुसऱयाचा खिसा तिसऱयाच पँटीला अशी विदारक स्थिती समोर आली आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर फोटोसह माहिती शेअर करीत सरकारच्या नाकर्तेपणाची पोलखोल केली आहे.
राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात या घोषणा केवळ फार्स असल्याचे एकेका घटनेतून समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रयोगशाळेत शिकवा, पण शिक्षण मंत्री दीपक केसरकर तुम्ही तर त्यांची प्रयोगशाळाच करून ठेवली, असा सणसणीत टोला दानवे यांनी लगावला आहे. प्रसिद्ध केलेल्या फोटोत याचे प्रतिबिंब दिसत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. ही विद्यार्थ्यांची चेष्टा असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.
ना कपडा धड, ना शिलाई… अर्धे विद्यार्थी गणवेशाविना
z 15 ऑगस्ट 2024पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. तेही हे असले बोगस!
z कपडय़ाचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची, हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत.