हॉर्वर्ड, स्टेनफोर्डला धनाढय़ांची पसंती

जगातील 17 टक्के धनाढय़ मंडळींनी टॉपच्या 10 विद्यापीठांतून शिक्षण घेतलंय. त्यातील सात प्रमुख विद्यापीठ अमेरिकेतील आहेत. तर ब्रिटनमध्ये दोन आणि फ्रान्समध्ये एक विद्यापीठ आहे. जगभरातील 13.3 टक्के धनाढय़ या विद्यापीठांतून शिकले आहेत.

ज्या लोकांकडे 100 दशलक्षपेक्षा डॉलर किंवा त्याहून अधिक संपत्ती आहे त्यांना सेंटी मिलिनियर्स असे म्हटले जाते. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी, स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वियानिया, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, येल युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी या अमेरिकेतील युनिव्हर्सिटीमधून जगभरातील एपूण सेंटी मिलिनियर्सपैकी 13.3 टक्के अब्जाधीश शिकले आहेत.

n जगभरातील 2.9 टक्के श्रीमंतांनी ब्रिटनच्या दोन प्रमुख विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलंय. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड पाचव्या स्थानावर आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून 1.6 टक्के सेंटी-मिलेनियर्सनी शिक्षण घेतलेय. युनिव्हर्सिटी ऑफ पेंब्रिज सातव्या स्थानावर आहे.