क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सुसज्ज क्रीडा सुविधा केंद्र उभारण्यासाठी वांद्रे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी हा भूखंड क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रक्षिशण केंद्रासाठी 1998मध्ये वितरीत करण्यात आला होता. मात्र या भूखंडावर कोणतेही काम न झाल्याने शासनाने तो परत घेतला आहे. या भूखंडाची सध्याची परिस्थिती वाईट असून, आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी याचा वापर करत आहेत. त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने ठराव करून हा भूखंड माजी कर्णधार अजिंक्य मधुकर रहाणे याला देण्याची शिफारस केली. अजिंक्य रहाणेला तीस वर्षांकरिता भाडेपट्टय़ाने हा भूखंड देण्यात येणार आहे.