जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झाला, पोलीस महासंचालकांची कबुली

काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे, असे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक पत्र ट्विट करत कबुली दिली आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी पोलीस काम करत राहतील असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

राज्यात गोळीबार, हत्या तसेच अन्य गुह्यांच्या घटना राजरोस घडू लागल्या आहेत.  त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. असे असतानाच पोलीस महासंचालकांनी आता नागरिकांना उद्देशून एक पत्र समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे.

दरम्यान, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दिवसाढवळ्या गुंडागर्दी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांचे हे पत्र महत्त्वाचे आहे.