सेंट झेवियर्स कॉलेजचा जेनफेस्ट 25, 26 जानेवारीला दिग्गज कलाकारांची अद्भुत मैफल

संगीतप्रेमी आणि रसिक श्रोत्यांसाठी कायम पर्वणी ठरलेला सेंट झेवियर्स कॉलेजचा ‘जेनफेस्ट 24’ हा संगीत महोत्सव येत्या 25, 26 जानेवारीला होणार आहे. 25 जानेवारीला सायंकाळच्या सत्रात तसेच 26 जानेवारीला सकाळ आणि सायंकाळच्या अशा दोन सत्रांत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

‘जेनफेस्ट 24’ च्या निमित्ताने ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलेले कलाकार आणि काही असे कलाकार ज्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात या कॉलेजमध्ये झाली आहे ते या माध्यमातून रसिक श्रोत्यांच्या एक अद्भुत मैफल घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे यंदाचे ‘जेनफेस्ट’चे 50 वे वर्ष असून याचे नियोजन पूर्णपणे विद्यार्थी करीत आहेत.

सेंट झेवियर्स कॉलेजच्या इंडियन म्युझिक ग्रुपला या वर्षी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या ‘जेनफेस्ट’लाही विशेष महत्त्व आले आहे. येथे सादरीकरण करणारे अनेक कलाकार त्यांच्या गायन-वादनाच्या विशेष शैलीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतात.

7 जानेवारीला इंडियन म्युझिक ग्रुपचा बर्थ डे कन्सर्ट साजरा केला जाईल आणि कलाकार सारणी प्रसारित करण्यात येईल. त्यानंतर तिकीट विक्री सुरू होईल. जर शास्त्रीय संगीत तुमच्या मनाला भावत असेल तर आवर्जून एक श्रोता म्हणून या सोहळय़ाला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘जेनफेस्ट’च्या टीमने केले आहे.