Photo- धुक्यात हरवले पुणे!

फोटो, दत्तात्रय आढाळगे पुणे
फोटो, दत्तात्रय आढाळगे पुणे

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या सरासरी तापमानात घट होत आहे. त्यामुळे राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढत आहे.

दरम्यान पुण्यातील विश्रांतवाडी,धानोरी, लोहगाव या परिसरातील नागरिकांना थंडीमुळे सकाळीच्या वेळेत दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली.

त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पसरलेल्या या दाट धुक्याचा मनमुराद आनंद घेता आला.

पुणे शहरात पडलेले धुके इतके दाट होते की सकाळच्या वेळेत काही विशिष्ट अंतरावरील दृश्य अगदीच पुसट दिसत होते.

यामुळे सकाळच्या वेळेत कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गाडी चालवताना त्रास सहन करावा लागला. धुके पसरल्यामुळे गाडीची हेडलाईट लावूनही समोरचा रस्ता दिसत नव्हता.

शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हे धुके परिसरात सर्वत्र पसरले होते. त्यामुळे पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता आला.