भरधाव कारने पाच पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना दिल्लीतील उत्तर-पूर्व जिल्ह्यातील करावल नगरमध्ये घडली. या अपघातात 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अदनान असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करवाल नगरमधील मॅन नगरमध्ये ही घटना घडली. भरधाव स्विफ्ट कारने पाच जणांना चिरडले. चालकाने मद्यप्राशन केले होते. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघाताची घटना घडली.
पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.