आज सीएसएमटी बंद, कल्याण, डोंबिवलीपासून 20 लाख चाकरमान्यांचा लोंढा रस्त्यावर

मध्य रेल्वेने घेतलेल्या 63 तासांच्या मेगाब्लॉकचा मोठा फटका आज चाकरमान्यांना बसला. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरपासून ठाण्यापर्यंत लोकलने प्रवास केलेले 20 लाखांहून अधिक चाकरमानी आज ठाण्यापासून मुंबईला मिळेल त्या वाहनाने रस्ता मार्गाने निघाले आणि इस्टर्न एक्प्रेस हायवेवर तुफान वाहतूककाsंडी झाली. मुलुंडच्या टोलनाक्यापासून ते थेट सायनपर्यंत गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूककाsंडीत अनेक तास प्रवाशांची रखडपट्टी झाली.

ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने गुरुवार मध्यरात्रीपासून 36 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेतला आहे. त्याचा फटका कसारा, कर्जतपासून मुंबईपर्यंत प्रवास करणाऱया लाखो चाकरमान्यांना बसला. कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, विठ्ठलवाडी, दिवा, खर्डी, आसनगाव, आटगाव, उल्हासनगर, शहाड, टिटवाळा येथून लोकलने निघालेले प्रवाशी एकाच वेळी ठाणे रेल्वे स्थानकावर उतरले. त्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाणे रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी उसळली होती. ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1वरून मोठय़ा अंतराने धिमी लोकल सुटत असल्याने या लोकलने चाकरमानी अक्षरशः लटकून प्रवास करत होते. त्यामुळे असंख्य नोकरदारांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसर आणि हायवेवर येऊन रिक्षा, टीएमटी बस, बेस्ट बस आणि ओला-उबेरच्या माध्यमातून गाडय़ा बुक करून मुंबईकडे कूच केली. स्वतःच्या कार असूनही लोकलने प्रवास करणाऱया चाकरमान्यांनी आज कार घेऊन रस्ते मार्गानेच जाणे पसंत केले. त्यामुळे 20 लाखांहून अधिक प्रवाशी एकाच वेळी रस्त्यावर आल्याने मुलुंड टोलनाक्यापासूनच तुफान वाहतूककाsंडी झाली होती.दोन ते तीन तासांच्या लटपंतीनंतर त्यांनी कसेबसे ऑफिस गाठले.

सीएसएमटी बंद

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट 10 आणि 11 ची लांबी वाढविण्यासाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा ब्लॉक रविवारी दुपारी 12.30 वाजेपर्यंत असणार आहे. शनिवारी आणि रविवारी बहुतेक सरकारी तसेच खासगी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांना या ब्लॉकची फारशी झळ बसणार नाही. ज्यांनी गेट वे ऑफ इंडिया आणि कुलाबा परिसरात फिरण्याचे प्लॅन केले आहेत त्यांना मात्र गर्दी टाळण्यासाठी प्लॅन रद्द करावे लागतील. दरम्यान, प्रवाशांची अडचण लक्षात घेता पश्चिम रेल्वेने रविवार, 2 जून रोजी होणारा जम्बोब्लॉक रद्द केला आहे.

मुंबई विद्यापीठाला आज सुट्टी

मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या विशेष जम्बो ब्लॉकमुळे उद्या शनिवार, 1 जून रोजी मुंबई विद्यापीठाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याऐवजी जून महिन्याचा दुसरा शनिवार, 8 जून रोजी विद्यापीठातील सर्व कार्यालये सुरू राहणार आहेत. तसेच उद्या होणाऱया दोन विषयांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

534 लोकल फेऱया आज रद्द

शनिवारी मध्य रेल्वेवरील 534 लोकल फेऱया रद्द करत रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. ब्लॉकवेळी सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळादरम्यान अप आणि डाऊन जलद, धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल. तसेच अनेक लोकल भायखळाऐवजी दादर, परळपर्यंत चालविण्यात येतील.

आठ तासांमध्ये रेल्वे रूळ शिफ्ट
फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतल्यानंतर आठ तासांमध्ये फलाट क्रमांक पाचवर पूर्वीचे रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी शिफ्ट केले आहेत. या कामासाठी सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर, अभियंते, कर्मचारी कार्यरत होते, अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली.