चिंता मिटली! सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार; SpaceX Crew-9 ची ISS वर यशस्वी भरारी

गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर येणार आहे. सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणणारे NASA SpaceX Crew-9 मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले आहे. हे ड्रॅगन क्रू कॅप्सूल केप कॅनवेरल, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्यात आले. यापूर्वी हे मिशन 24 सप्टेंबर 2024 रोजी होणार होते. मात्र हवामानामुळे त्याचे 28 सप्टेंबर रोजी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्वीट करत ड्रॅगन क्रू कॅप्सूलने यशस्वी प्रक्षेपण केल्याची माहिती दिली. अंतराळवीरांना आणण्यासाठी जे SpaceX चे ड्रॅगन क्रू कॅप्सूलमध्ये दोन अंतराळविरांना पाठवण्यात आले आहे. जेणेकरून सुनिता आणि बुच विल्मोर यांना घेऊन येता येईल. या मोहिमेत आता रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव आणि पायलट निक हेग यांना पाठवण्यात आले आहे. हे दोघेही अंतराळवीर शनिवारी फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून निघाले. आणि हे कॅप्सूल रविवारी सुमारे 5:30 ET वाजता सुखरूप पणे पोहोचले.

दरम्यान ISS च्या कमांडर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी ड्रॅगन क्रू मधून आलेल्या दोन अंतराळविरांचे स्वगत केले. ‘मला आमच्या नवीन साथीदारांचे स्वागत करायचे आहे. आता हेग आणि गोर्बुनोव हे अंतराळात असलेल्या इतर अंतराळवीरांमध्ये सहभागी झाले आहेत’, असे त्या यावेळी म्हणाल्या. मिळालेल्या माहितीनुसार ISS वर असलेले चार अंतराळवीर आता पुढील आठवड्यात त्यांच्या स्वतःच्या SpaceX कॅप्सूलमधून पृथ्वीवर परत येण्याची तयारी करू शकतात. ड्रॅगन कॅप्सूलला स्पेस स्टेशनशी जोडण्यासाठी स्टारलाइनर आधीच पृथ्वीवर पाठवण्यात आले आहे.