उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारतीय कामगार सेना लार्सन अॅण्ड टुब्रो युनिटतर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भारतीय कामगार सेना कार्याध्यक्ष अजित साळवी आणि संचालक विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी 867 युनिट रक्त संकलन करण्यात आले. चिटणीस सुधाजी आंगणे, चिटणीस संदीप राऊत, युनिट अध्यक्ष  यशवंत सावंत, कार्याध्यक्ष अमोल शिळीमकर, जनरल सेव्रेटरी विनायक नलावडे, उपाध्यक्ष कृष्णकांत कदम, खजिनदार प्रवीण मोरे यावेळी उपस्थित होते.

विलेपार्ले येथे साखर वाटप

शिवसेना शाखा क्र. 84 तर्फे 27 जुलै रोजी सकाळी 11  वाजता विभागातील नागरिकांना साखर वाटप करण्यात येणार आहे. विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शाखा क्र. 84 येथे हा साखर वाटप कार्यक्रम होणार आहे.

युवासेना व माऊली प्रतिष्ठानतर्फे ठाकूरद्वार येथील प्रभू सेमिनरी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी माऊली प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष पल्लवी सकपाळ, युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ, कुलाबा समन्वयक अॅड. उदय बने, उपविभाग संघटक सरिता तांबट, समन्वयक अपर्णा सावंत, शाखा संघटक माधुरी पेंढारी, यशवंत कोळेकर, दिलीप म्हात्रे, उपशाखाप्रमुख अशोक मोरे, राजेश अवसरे, बंडय़ा सुर्वे, महेश मसानी, विजय मकांबले, सूर्यकांत गिजे, प्रदीप चेऊलकर उपस्थित होते.

शिवसेना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र शाखा क्र. 77 च्या वतीने आणि माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिकांना छत्रीवाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते आणि युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, उपविभागप्रमुख दिलीप साटम, महेश गवाणकर, प्रियांका आंधळे, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, उदय हेगिष्टे, रिटा राघवा, अमित पेडणेकर, रूपेश कोळंबे, तुळशीराम चिपळूणकर, श्यामसुंदर साळकर यावेळी उपस्थित होते.

 उपविभागप्रमुख संपत ठाकूर यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, कुलाबा विधानसभा प्रमुख विकास मयेकर, युवती विभाग अधिकारी पायल ठाकूर, कुलाबा समन्वयक दीपन मोघे, उपविभाग संघटक सरिता तांबट, समन्वयक विशाखा पेडणेकर, शाखाप्रमुख मंगेश सावंत, शाखा संघटक माधुरी पेंढारी, उपशाखाप्रमुख रूपेश बोंबले, सूर्यकांत गिझे, राजू अवसरे, अजय पेढे, संतोष पालेकर, शांताराम सुर्वे, अमोल बैराई, समृद्धी घोरपडे उपस्थित होते.

‘भारतीय नागरिक संहिता’ विषयावर व्याख्यान

शिव विधी व न्याय सेनेतर्फे 27 जुलै रोजी 4 ते 6 या वेळेत शिवसेना भवन येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात भारतीय दंड विधान ऐवजी लागू करण्यात आलेल्या भारतीय नागरिक संहिता या विषयावर बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालायाचे ज्येष्ठ वकील अॅड. सुदीप पासबोला यांचे व्याख्यान होणार आहे तसेच नव्याने लागू केलेल्या नवीन कायद्यांवर आधारित ‘बेअर अॅक्ट 2024’ या पुस्तकाचे वाटप करण्यात येईल.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब, उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना सचिव पराग डाके आणि साईनाथ दुर्गे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनावणे आणि उपाध्यक्ष अॅड. सुरेखा गायकवाड आहेत.

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

शिवसेना आणि युवासेना वरळी विधानसभेच्या वतीने लायन ताराचंद बापा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या सहकार्याने 27 जुलै 2024 ते 26 जुलै 2025 या कालावधीत 1 हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. रुग्ण महाराष्ट्राचा रहिवासी असावा, केसरी व पिवळे रेशनकार्ड धारक असावा, लेन्सचे केवळ 1 हजार रुपये आकारले जातील. अधिक माहितीसाठी युवा विभाग अधिकारी संकेत सावंत (8879202077) आणि युवती विभाग अधिकारी (9870005768) यांच्याशी संपर्क साधावा.