मणिपूरमधील हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू

मणिपूर गेल्या दीड वर्षापासून धगधगत असून शनिवारी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला. जेरबाम जिह्यात कुकी आणि मैतेई समाजात पुन्हा हिंसाचार पेटला असून तो थांबवण्यासाठी राज्य सरकारने लष्करी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तसेच अतिरिक्त लष्करी दल आणि ड्रोनच्या सहाय्याने राज्यातील घडामोडींवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या हिंसाचारानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टी तेच भाजपचे नेतेही उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर मणिपूरमधील सद्यस्थिती आणि बैठकीत घेतलेल्या निर्णयांची एन. बिरेन सिंह यांनी राज्यपाल एल. आचार्य यांना राजभवन येथे जाऊन माहिती दिली.