आयएसआयचा पाकिस्तानी कोर्टांवर दबाव

न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय गुप्तचर संस्था ढवळाढवळ करत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या उच्च न्यायालयातील सहा न्यायमूर्तींनी एका पत्राद्वारे केला आहे. या पत्रानंतर लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेण्याची घोषणा आज केली.

सुप्रीम कोर्टाने आज या प्रकरणी सुनावणी घेण्याची घोषणा केल्यामुळे पाकिस्तानातील न्यायपालिका आणि लष्कर यांच्यातील समीकरणाला एक नवा पैलू प्राप्त होणार आहे. न्यायपालिका आणि लष्कर यांच्यात दीर्घकाळापासून वाद-तणावाचे वातावरण आहे. 26 मार्च रोजी 6 जजनी लिहिलेल्या एका पत्रात, आयएसआय न्यायालयीन बाबींमध्ये निर्लज्जपणे ढवळाढवळ करत असल्याचे म्हटले होते.