हमीभावावरून शेतकरी आक्रमक झाले असताना केंद्र सरकारने आज रब्बी हंगामातील सहा पिकांच्या एमएसपी अर्थात किमान हमीभावात वाढ केली. गव्हाच्या किमान हमीभावात 150 रुपयांची वाढ केल्याने गव्हाला आता 2 हजार 475 रुपये क्विंटल हमीभाव मिळेल. तर मोहरीला क्विंटलमागे 5 हजार 950 रुपये भाव मिळेल, जवसाला 1 हजार 980 रुपये, हरभऱयाला 5 हजार 650 रुपये, मसूरला 6 हजार 700 रुपये, तर करडईला 5 हजार 940 रुपये हमीभाव मिळेल.
पीक वाढ (é.)
गहू 150
मोहरी 300
जवस 130
हरभरा 210
मसूर 275
करडई 140