तीन दिवसांचा महामेगाब्लॉक नंतर सोमवारपासून पुर्ववत झालेली मध्यरेल्वेची वाहतूक सोमवार सकाळपासून पुन्हा कोलमडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिसवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा 20 ते 30 मिनिटं उशिराने धावत होती.
मध्य रेल्वेवर गेल्या शुक्रवार ते रविवार म्हणजेच 31 मे ते 2 जून दरम्यान जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सीएसएमटी स्थानकातील 10 व 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी व ठाणे स्थानकावरील 5 व 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला. या दरम्यान तब्बल 950 हून अधिक लोकल रद्द केल्या होत्या.