भाजपने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली, राजकीय वैर वैयक्तीक शत्रूत्वापर्यंत आणले; संजय राऊत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्राला विचारांची आणि राजकारणाची संस्कृती आणि संस्कार आहेत. हे सर्व बिघडवण्याचे काम भाजपने केले आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. भाजपने राजकारणात वैयक्तीक शत्रूत्व आणण्यास आणि ते कुटुंबापर्यंत नेण्यास सुरुवात केली. आमचे कोणाशीही वैयक्तीक वैर नाही. आमचे वैचारीक मतभेद आहेत. आम्ही कोणालाही वैयक्तीक शत्रू मानत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

राजकारणात वैयक्तीक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तीक शत्रूत्वाला सुरुवात केली. राजकारणात विचारांची लढाई विचारांनी व्हावी, हा महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. राजकारणात भूमिकांवर, विकास कामांवर चर्चा व्हावी, वैयक्तीक हेवेदावे, शत्रूत्व राजकारणात असून नये, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा संस्कार यशवंतराव चव्हाणांपासून, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यापर्यंत कायम होता. मात्र, भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले. राजकीय वैर राजकारणातच ठेवले पाहिजे, ती विचारांची लढाई आहे. त्यात वैयक्तीक सत्रूत्व आणू नये, कोणचेही कुटुंब उद्ध्वस्त करू नये, असे आमचे मत असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजप दुर्दैवाने हे सर्व करत आहेत. फडणवीस आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तीक शत्रू म्हणून पाहत नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दलित, शोषित आणि वंचित सामाजाचे नेतृत्व करणारे नेते दुर्दैवाने फक्त स्वतःचा विचार करतात. मात्र, समाजाला काय मिळाले, याचा विचार कोणीही करत नाही. सत्ताधाऱ्यांचे गुलाम म्हणून त्यांनी समजाला बांधून ठेवले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करण्याच्या नावाखाली त्यांनी समाजाला लढत ठेवले. रामदास आठवले यांना काही मिळाले नाही, असे म्हणता येणार नाही. ते अनेक वर्षे मंत्री आहेत. ते चांगल्या बंगल्यात राहतात. समाजाचे मात्र हाल होत आहेत. मात्र, आता हे सर्व जनतेला समजले असून जनता आता महाविकास आघाडीसोबत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते महायुतीत आहेत, त्यांना जागा देण्यात आली नाही, तर महाविकास आघाडी त्यांना जागा देणार काय, असा टोलाही त्यांनी लगावला.