राहुल गांधी यांच्या जिवाला धोका, त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत दिल्लीपासून लखनऊ आणि महाराष्ट्रात ज्याप्रकारची भाषा करण्यात येत आहे, तसेच त्यांना धमकी देण्यात येते, त्यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचण्यात येत असल्याची शक्यता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. परदेशात राहुल गांधी यांच्यावर हल्ल्याचा कट रचण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोपही संजय राऊत यांनी केला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात षडयंत्र रचण्यात येत आहे. त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्याविरोधात परदेशात कारस्थान रचण्यात येत आहे. दिल्लापासून, लखनऊ महाराष्ट्रापर्यंत राहुल गांधी यांच्याविरोधात धमकीची भाषा काही पक्षातील नेते करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून राहुल गांधींबाबत होणारी विधाने गंभीर आणि चिंताजनक आहेत. अशा वक्तव्यांविरोधात केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा काहीच बोलत नसल्याने त्यांची याला समंती आहे काय, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देईल, असे वक्तव्य करण्यात येत आहे. रशियात अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. पुतीन यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना संपवले आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. तसेच तुमची अवस्था तुमच्या आजीसारखी आणि वडिलांसारखी करू, अशी धमकी राहुल गांधी यांना देण्यात येत आहे. अशा परिस्थिती असताना देशात लोकशाही आहे काय, असा सवाल निर्माण होत आहे.

मोदींच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसत आहे; पंतप्रधान चंद्रचूड भेटीवर संजय राऊत यांचे टिकास्त्र

राहुल गांधी यांना ठार मारण्याची धमक्या दिल्या असताना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यावर काहीही कारवाई करत नाही. त्यांमुळे तेदेखील या षडयंत्रात सहभागी आहे काय, अशी शंका येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या जिवाला धोका आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्याचे राजकारण हुकूमशाही देशात चालते. आपल्या देशात संविधान सर्वाोच्च आहे. तसेच विरोधी पक्ष लोकशाहीच्या रक्षकाच्या भूमिकेत आहे. लोकशाहीत अशा घटना गंभीर असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.