नाहूर ते मुलुंडपर्यंत रेल्वेला समांतर जोडमार्ग उभारा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिवसेनेची मागणी

नाहूर गावावरून मुलुंड पूर्वेकडील सनरूप इमारतीपर्यंत मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकदा आपत्कालीन स्थितीत एखाद्या ठिकाणी पोहोचणे अत्यंत कठीण होऊन जाते. हे लक्षात घेऊन याच मार्गावर रेल्वेला समांतर मार्ग उभारण्यासाठी विकास आराखडा 2034 मंजूर करण्यात आला आहे. हा समांतर लिंक रोड बांधून वाहतुकीसाठी सुरू केल्यास मुलुंड पूर्व आणि पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या ठिकाणी पोहोचणे सोयीचे होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाहूर ते मुलुंडपर्यंत रेल्वेला समांतर जोडमार्ग उभारण्याची मागणी ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद धुरी यांनी केली आहे.

नानेपाडा आणि नाहूर (भांडुप) ला जोडणारा हा मार्ग शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तसेच गर्दीचा आणि इतर मार्गावरील प्रवाशांना अधिक सुखकर होणे गरजेचे आहे. परंतु या जागेवर अनधिपृतपणे बाग, लग्नमंडप आणि मंदिरे उभी करून हा मार्ग हेतुपुरस्सर अडविण्यात आला आहे. नाहूर ते मुलुंडपर्यंत रोज सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास मोठय़ा प्रमाणावर वाहतूककाsंडी होते. त्याचबरोबर लहान मुले, वृद्धांचे रस्त्यावरून चालताना प्रचंड हाल होतात. त्यामुळे नाहूर गाव ते मुलुंड लिंक रोडपर्यंत समांतर जोडमार्ग रस्ता बांधून तो वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. याबाबत  मुंबई महापालिकेच्या एन विभाग कार्यालयातील उपआयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे.