महानिष्ठा… महान्याय… महाराष्ट्र, आदित्य ठाकरे यांची आज लालबागमध्ये झंझावाती सभा

शिवसेनेने ‘महानिष्ठा, महान्याय, महाराष्ट्र’ अभियानाचा झंझावात महाराष्ट्रात सुरू केला असून या अभियानात उद्या लालबागमध्ये शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आता आपलाच झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अशी गर्जना करत आदित्य ठाकरे रणमैदानात उतरले आहेत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांचे दणदणीत संवाद मेळावे झाले. त्यानंतर उद्या लालबागमध्ये आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 11 (शिवडी, वरळी, भायखळा)च्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते सचिन अहिर, मनोज जामसुतकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील शिंदे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना विधिमंडळ गटनेते आमदार अजय चौधरी यांनी दिली.

स्थळ – मेघवाडी, लालबाग

वेळ – सायंकाळी 6 वाजता