लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह ठाणे, कल्याण, नाशिकसारख्या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात मतदान होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जनतेला मतदानाचे आवाहन करण्यासाठी त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
आज मतदानाचा दिवस. लोकसभेच्या निवडणूकीचा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा. लोकशाही टिकवण्याची शेवटची संधी. मतदारांनी नक्की मतदानासाठी घराबाहेर पडा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि लोकशाही टिकावी ह्यासाठी भरभरून मतदान करा!
धगधगणारी क्रांतीची ज्वाला पेटत रहायला हवी, हुकूमशाही गाडून टाकायला…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 20, 2024
एक्सवर पोस्ट करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, आज मतदानाचा दिवस. लोकसभेच्या निवडणूकीचा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा. लोकशाही टिकवण्याची शेवटची संधी. मतदारांनी नक्की मतदानासाठी घराबाहेर पडा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि लोकशाही टिकावी ह्यासाठी भरभरून मतदान करा! धगधगणारी क्रांतीची ज्वाला पेटत रहायला हवी, हुकूमशाही गाडून टाकायला हवी!, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.