मलकापूरमधील हुतात्मा स्मारक रस्त्याचे डांबरीकरण करा, शिवसेनेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदन

हुतात्मा स्मारक ते महामार्गाच्या सेवारस्त्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, खडीकरण करून तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांनी मलकापूरचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नितीन काशीद यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामार्ग सेवा रस्ता ते हुतात्मा स्मारकापर्यंत असलेल्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गाच्या दुतर्फा नागरीवस्ती असून, हा रस्ता हुतात्मा स्मारक या वास्तूला जोडला गेला आहे. कालिदास मार्केट तसेच टकले हॉस्पिटल, शिवसेनेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदन महाजन हॉस्पिटल, बालसुधार केंद्र या रस्त्यावर असताना गेले 15 ते 20 वर्षे कसल्याही प्रकारचे खडीकरण, मजबुतीकरण वा डांबरीकरण करण्यात आलेले नाही.

या रस्त्याच्या दुतर्फा हॉस्पिटल्स, नागरी वस्ती असून, येथील नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची व या भागातील नागरिकांची गैरसोय होत असते. हुतात्मा स्मारकात कार्यक्रमास येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत असते. याबाबत 6 जून 2023 मध्ये निवेदन दिले ख्याधिकारी कापूर नगरपरिषद जि. सातारा होते; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, शहरप्रमुख मधुकर शेलार, उपशहरप्रमुख नीलेश सुर्वे, तालुकाप्रमुख दिलीप यादव, शशिकांत हापसे, उपतालुकाप्रमुख संजय चव्हाण, संघटक विद्यानंद पाटील, विभागप्रमुख ओंकार काशीद यांच्या सह्या आहेत.