शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाराशिव मतदारसंघात जनसंवाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 7 आणि 8 मार्च रोजी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दोन दिवसांत पाच सभा होणार असून त्यानिमित्ताने संपूर्ण मतदारसंघात भगवे चैतन्य पसरले आहे. या सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख आमदार कैलास घाडगे पाटील, दिनकर माने, रणजित पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा समन्वयक पप्पू कुलकर्णी आदींनी केले आहे.

7 मार्च
दुपारी 12 वाजता लातूर येथे खासगी विमानाने आगमन
दुपारी 12.30 वाजता औसा येथे सभा
दुपारी 4 वाजता उमरगा येथे सभा
संध्याकाळी 7 वाजता तुळजापूर येथे सभा

8 मार्च
सकाळी 11 वाजता कळंब येथे सभा
दुपारी 4 वाजता भूम येथे सभा