माजी आमदार दळवींसोबत भाजपात गेलेल्या दापोलीतील शिवसेना कार्यकर्त्यांची पुन्हा शिवसेनेत घरवापसी

दापोली मतदार संघाचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यासमवेत भाजपामध्ये प्रवेश केलेल्या दापोलीतील शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने भाजपातील त्यांचा प्रवेश हा औट घटकेचाच ठरला.

दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार सुर्यकांत दळवी यांनी आपल्याला शिवसेना नेतृत्व विचारात घेत नाही अशाप्रकारची खोटीच बोंब करत केवळ स्वतःच्या फायदयासाठी खरे कारण लपवत भाजपामध्ये 14 दिवसापूर्वी प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत हाताच्या बोटावर मोजण्याईतपतच कार्यकर्ते प्रवेश करण्यासाठी उपस्थित होते त्यात दापोली तालुक्यातील शिरसोली येथील रविंद्र जाधव तसेच आवाशी येथील मुळ रहीवाशी आणि सध्या मंडणगड तालुक्यातील दहागावमध्ये राहणारे आयुब मसुरकर हे दोघे होते. आपली दिशाभूल झाली असल्याचे सांगत या दोघांनीही माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करत घरवापसी केल्याने त्यांचा भाजपामध्ये झालेला पक्ष प्रवेश हा केवळ औट घटकेचा ठरला आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करून माजी आमदार सुर्यकांत दळवींनी शिवसेनेतून कार्यकर्त्यांसह भाजपात केलेला पक्ष प्रवेश हा फुसका बार ठरला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम हेच या मतदार संघाचा सर्वागिन विकास करू शकतील याची मनोमन खात्री पटलेले व भाजपात डेरे दाखल झालेल्या मुळच्या शिवसैनिकांपैकी अजून काहीजन मसुरकर जाधवांसारखे पुन्हा शिवसेनेत घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. हा भाजपासह माजी आमदार सुर्यकांत दळवी यांना मोठा धक्का आहे.