प्रत्येकवेळी भगव्याचा घात गद्दारांनीच केलाय; उद्धव ठाकरे कडाडले

जनतेला न्याय देण्याचा, महाराष्ट्रधर्म राखण्याचा, महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्याचा आणि गद्दारांचा कडेलोट करण्याचा निर्धार करून शिवसेनेने आता विधानसभेच्या दिशेने कूच केले आहे. चला जिंकूया… अशी गर्जना करत शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पुणे येथे होत आहे. त्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. वाचा या मेळाव्याचे सर्व लाईव्ह अपडेट…

  • गद्दारांनी चोरबाजार मांडलाय. पुणे, मुंबईत लूट सुरुय. कॉन्ट्रॅक्टरच्या रुपाने पैसा ओरबाडताहेत. हाचा पैसा निवडणुकीत वापरणार – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • जनता न्यायाधीश असून आपल्या शिवसेनेची बाजू मांडणारे तुम्ही शिवसैनिक दूत, वकील आहात. जनता न्यायालयात सुनावणी सुरू झालीय. जनता आपल्याच बाजूने न्याय देईल – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • शिवसेना म्हणजे भाकड जनता पक्ष नाही. तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे. त्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर सोपवली – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • प्रत्येकवेळी भगव्याचा घात गद्दारांनी केला आहे. छत्रपती संभाजीराजे असो किंवा स्वराज्य असो – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र धर्माला पुढे नेणारे, साधू-संतांचे आमचे हिंदुत्व आहे – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • समाजासमाजात भांडणं लावायची, दुसऱ्यांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या अन् तुमच्या पोळ्या भाजायच्या हे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवले नाही. कदाचित तुमच्या औरंगजेबाने शिकवलेले हिंदुत्व असेल – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • संघाचा आणीबाणीला पाठिंबा होता की विरोध हे तत्कालीन संरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या पत्रावरून स्पष्ट होते. देवरसांनी दोन पत्र तत्कालिन पंधप्रधान इंदिरा गांधी यांना पाठवले होते – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • अहमदशहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा इकडे वळवळायला आला होता. तो पण शहा, हे पण शहा. आम्हाला हिंदुत्व शिकवतो. नवाज शरीफचा केक खाणारी औलाद तुमची अन् तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • राम मंदिर गळतंय, नवीन संसद भवनही गळतंय. ज्यानं ते बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर पुण्यात नदी बुजवण्याचं काम करतोय. ‘कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका’ सुरुय – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • माझ्या नादाला लागू नका म्हणतात, पण तुझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीच
  • मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा दरोडेखोर – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख
  • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
  • आपण 288 उमेदवार उभे केले, तर किमान 160 जागा जिंकून आणू असे वातावरण आहे. पण आपण शब्दाला पक्के असून महाविकास आघाडी उद्वव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल – संजय राऊत
  • मशाल पेटत ठेवली पाहिजे आणि बाळासाहेबांचे ऋण फेडायचे असतील तर गद्दारांना गाडून विधानसभेवर भगवा फडकावयचा आहे – संजय राऊत
  • आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅनक्लबचे मेंबर आहोत, औरंगजेबाचे नाही. छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले, औरंगजेब गुजरातला जन्माला आला – संजय राऊत
  • हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर प्रेम करत असेल, श्रद्धा ठेवत असेल तर तो हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन् ही त्यांची शिवसेना आहे. ही एकनाथ शिंदेंसारख्या चोर, लफंग्यांना चोरता येणार नाही – संजय राऊत
  • ‘एक तर तू राहशील नाही तर मी राहीन’, हीच आपली निवडणुका जिंकण्याची टॅगलाईन आहे. – संजय राऊत
  • शिवसेनेला निवडणूक नवी नाही. अनेक जय, पराजय पाहिले. अनेक वार छातीवर अन् पाठीवरही झेलले – संजय राऊत
  • विधानसभेची लढाई लोकसभेपेक्षा तुंबळ होणार आहे. छातीचा कोट करून लढावे लागेल – संजय राऊत
  • लोकसभा ताकदीने लढलो व जिंकलो. नवीन पक्ष, चिन्ह, समोर पैशाची ताकद सगळ्याला पुरून उरलो – संजय राऊत
  • ही निवडणूक सोपी नाही. नुसती हवा निर्माण करून चालणार नाही – संजय राऊत
  • गेल्या काही वर्षात शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खुप वाहिल्या आता शिवसैनिकांनी स्वत:साठी लढायचंय – संजय राऊत
  • ये हसता हुआ चेहरा कुछ लोगो की जलने का कारण हे. महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धव ठाकरेंच्या हसण्यामुळे लागलेली आहे – संजय राऊत
  • संकटावर संकटं येताहेत, संघर्ष होतोय, कोंडी केली जातेय. पण आमचा नेता हसत हसत प्रत्येक संकटाचा सामना करतोय आणि लढण्याची प्रेरणा देतोय – संजय राऊत
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेळाव्यास्थळी आगमन.
  • लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ल्यातील हजारो नावं मतदान यादीतून गाळली गेली, त्यामुळे दुर्दैवाने ठरावीक जागेवर पराभव पत्कारावा लागला – विनायक राऊत
  • 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट हा शिवसंकल्प सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषात, उत्साहात साजरा करायचा आहे – विनायक राऊत
  • महाराष्ट्र मिंधे सरकार आल्यापासून 4 हजार आत्महत्या घडल्या. किमान 8 शेतकरी दररोज आत्महत्या करतात – अंबादास दानवे
  • महाराष्ट्राच्या डोक्यावर 7 लाख 82 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्यात एखादं बाळ 65 हजारांचे कर्ज घेऊन जन्मला येतंय. देशाला कर्जबाजारी करण्याचे काम सरकारने केलंय – अंबादास दानवे
  • देशात गेल्यावर्षी 35 लाख गुन्हे दाखल झाले. गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकात आहे. अपहरणामध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. चोरीमध्ये दिल्लीनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. विनयभंगात महाराष्ट्र एक नंबरला आहे. महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे – अंबादास दानवे
  • काल संभाजीनगरात मुख्यमंत्री आले होते. कार्यक्रम होण्याऐवजी त्यांना चार ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. हेच राज्य सरकारचे अपयश आहे – अंबादास दानवे
  • केंद्राने 748 योजना जाहीर केल्या. यातील एकही योजना यशस्वी नाही, फक्त कागदावर अनेक योजना आहेत – अंबादास दानवे
  • शिवसेनेला हरवणारा पैदा व्हायचाय. कितीही मोदी लटकले, शहा लटकले अन् फडणवीस सारखे लटकले तरी काहीही होऊ शकत नाही – अंबादास दानवे
  • आपल्याला जिंकण्याची सवय आहे. पण येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना गाडून निवडून येणे महत्त्वाचे आहे – अंबादास दानवे
  • पुण्यातील शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात