शिवसेना उभारणीमध्ये ज्येष्ठ शिवसैनिकांचा सिंहाचा वाटा – अनंत गिते

20 जून 2022 हा शिवसेनेच्या इतिहासातला काळा दिवस या दिवशी शिवसेनेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गद्दारी झाली. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, अगदी शिवसेना प्रमुख सुद्धा चोरले. त्यांनाही चोरी करण्याचे शिल्लक ठेवले नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये पुन्हा जी शिवसेनेने उभारी घेतली या उभारीमध्ये सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर तो महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा आहे. या दिवसानंतर मुंबईपासून अखंड महाराष्ट्रातला ज्येष्ठ शिवसैनिक हा रस्त्यावर उतरला. सगळ्यात पहिल्यांदा कोण उतरला असेल तर तो ज्येष्ठ शिवसैनिक उतरला शिवसेना वाचविण्यासाठी अशाप्रकारची आठवण शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी मंडणगड येथे भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना केली.

पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने मंडणगड तालूका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंडणगड तालूका प्रमुख संतोष गोवले यांच्या सुयोग्य नेर्तृत्व आणि मार्गदर्शनाखाली भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेने आयोजित केलेल्या या शिवसेनेच्या भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी केंद्रिय मंत्री अनंत गिते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख माजी आम. संजय कदम, तालुका प्रमुख संतोष गोवळे, तालुका संपर्क प्रमुख महेश गणवे, युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार, शिवसेना तालुका सचिव सुधिर पागार, तालुका समन्वयक अ‍ॅड. धनंजय करमरकर, शिवसेना शहरप्रमुख दशरथ सापटे, उप शहर प्रमुख दिपक घोसाळकर, उपतालुका प्रमुख मंगेश दळवी, संदिप वाघे, विभाग प्रमुख संजय बोत्रे, विशाल कडव, श्रीधर कदम, वामनराव जाधव, तालुका सह संपर्क प्रमुख रघुनाथ धनावडे, सुभाष भेलोशे, दिपक बैकर, माजी उप जिल्हा प्रमुख राजकुमार निगुडकर, माजी तालुका प्रमुख संतोष घोसाळकर, महिला आघाडी तालूका संघटीका शर्मिला कदम, माजी सभापती वैशाली चोरगे, युवासेना तालूका अधिकारी विश्वनाथ टक्के, उपतालूका अधिकारी सोहेल मुकादम, उमेश घागरूम, प्रकाश महाडीक, सिद्धार्थ शिंदे, सोहम पारेख, बरकत सातारकर, रोशन खरे, मारूती कुळे, दिपक बोर्ले आदी मान्यवर पदाधिकारी लोकप्रतिनिधींसह शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी मोठया संख्येने उपस्थिती होते.

यावेळी शिवसैनिका मार्गदर्शन करताना शिवसेना नेते अनंत गिते यांनी मंडणगड तालुक्याने लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आपल्याला दिलेल्या अधिक मताधिक्याचे समाधान व्यक्त करत हीच मताधिक्याची आघाडी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. सन 1986 मधील भगवा सप्ताहाच्या निमित्ताने मंडणगड तालूक्यातील पालवणी तसेच दापोली तालूक्यातील केळशी शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेनेची मुळूख मैदान तोफ अर्थातच कमांडर स्व. दत्ताजी साळवी यांच्या वर्कृत्व आणि नेतृत्वाचा तसेच तत्कालीन मुंबईचे महापौर दत्ताजी नलावडे, दत्ताराम गुजर, भाई मोरे वगैरे जेष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीचा आर्वजुन उल्लेख करत वाहनांसाठी सोडा पण साधा चालण्यासही धड रस्ता नसताना त्यावेळी शिवसैनिकांनी झोकून देत शिवसेना संघटना कशी वाढविली याचा ईतिहास कथन करत त्यावेळी शिवसैनिकांना वैयक्तिक जीवनच नव्हते. त्यांच्या झोकून देण्याच्या मेहनत आणि कष्टामुळे शिवसेना संघटना उभी राहीली त्यानंतर आमदार झाले खासदार झाले. शिवसेना या संघटनेवर अनेकांनी पीएचडी केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना वर्धापन दिनाला मुंबई येथील षन्मुखानंद सभागृहात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी भगवा सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले. या भगवा सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सांगितले. त्यात शिवसेना सदस्य नोंदणी कार्यक्रम घेताना सर्वप्रथम शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या आपल्या पक्ष संघटनेच्या सदस्यत्वाचा फाॅर्म भरला. आपण सर्वच शिवसैनिक असलो तरी आपल्याला आपल्या शिवसैनिक पदाची सदस्य नोंदणी करणे आवष्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांचेही जोरदार भाषण झाले. त्यालाही शिवसैनिकांची दाद मिळाली. या कार्यक्रमात 105 जेष्ठ शिवसैनिकांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ आणि मायेची उब म्हणून सन्मानाने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ब्लेंकेटचे वाटप करण्यात आले.