महाराष्ट्रावर सतत अन्याय होतोय त्याचं काही वेगळं कलम बसवलं आहे का? आदित्य ठाकरे यांचा भाजपला सवाल

शिवसेनेचा झंझावात आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. आज त्याची सुरुवात गिरगावपासून झाली. गिरगावात आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांचा मेळावा दणक्यात पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी दणक्यात भाषण करत केंद्रातील भाजप व मिंधे सरकारला फटकारले. जम्मू कश्मीरमधून केंद्र सरकारने 370 कलम काढले. पण सध्या महाराष्ट्रावर सतत अन्याय होतोय त्यामुळे आम्हाला प्रश्न पडलाय की या सरकारने महाराष्ट्रावर कोणते वेगळे कलम बसवले आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाषणाला सुरुवात करतानाच आदित्य ठाकरे यांनी यंदाचे वर्ष हे आपलेच असणार, आपणच गाजवणार असा विश्वास व्यक्त केला. ”मी यावर्षी पहिल्याच दिवशी, पहिल्या मिनिटाला सांगितलेलं की हे वर्ष आपलंच आहे व आपलंच असणार. हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. 2024 ची वाट आपण अनेक वर्ष पाहतोय. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई, महाराष्ट्र वाट पाहतेय. आपल्याला दिल्लीला दाखवायचं आहे की हे वर्ष आपणच गाजवणार”, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

”या वर्षाचा पहिला मेळावा आपल्या दक्षिण मुंबईतून घेत आहोत. ही मुंबई आपलीच राहणार हे आपण ठरवलेलंच आहे. आज तुमच्या सगळ्यांचे आशिर्वाद घेत असताना सुरुवात आपण दक्षिण मुंबईतून करत आहोत. संपूर्ण देशांचं लक्ष द. मुंबईवर असतो. हीच दक्षिण मुंबई देशाला चालवत आलेली आहे. देशाला पुढे नेत आलेली आहे. पण पोटदुखी नक्की हीच यांची पोटदुखी आहे की संपूर्ण देशाला भाजप चालवतेय. सर्व मोठे कार्यालय, व्यवसाय, ऑफिसेस सर्व दक्षिण मुंबईत आहेत. पण गेल्या दहा वर्षात ते कुठे गेले. आपण त्यांचे काही बिघडवलेले आहे का. गेले अनेक वर्ष इथे कारभार करणारे मोठे व्यावसायिक ऑफिसेस होते ते एक एक करून मुंबईतून हलवले गेले. आता आपल्याला कळत असेल की हे जे सरकार आपल्या डोक्यावर बसवले गेले आहे ते महाराष्ट्र द्वेष्टी आहे. यांनी कश्मीरमधलं 370 कलम काढलं असेल पण महाराष्ट्रावर काही वेगळा कलम बसवलाय का की महाराष्ट्रावर सतत अन्याय अन्याय करत बसायचा हा माझा त्यांना प्रश्न आहे. सध्या जो काही अन्याय होतोय तो महाराष्ट्रावर होतोय. यांनी आपलं सरकार पाडून आपल्या महाराष्ट्रात बिल्डर खोके सरकार बसवलं. हे सरकार सामान्यांचं आहे का? तुमच्या हिताचं निर्णय घेतायत का? या सरकारचं काम मुंबईतून चालतोय का? असा सवाल आदित्य़ ठाकरे यांनी केला.

”मविआची अडीच वर्ष सोडली तर जे काही भाजपचं सरकार होतं. जे काही आपल्याकडे यायचं होतं ते हळू हळू पलिकडच्या राज्यात ढकललं आहे. आता तर अगदी खुलेपणे निर्लज्जपणे नेलं जातंय. आमच्या हक्काचं तिथे नेलेलं चालणार नाही. हे खोके सरकार महाराष्ट्राचं सरकार नाही महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. हे महाराष्ट्राच्या हिताचं सरकार नाही. हे मी परत परत सांगतोय. कारण निवडणूका तोंडावर आल्या आहेत. आता निवडणूका आल्या की मोठ्या मोठे होर्डिंग लावले जातील. सगळीकडे आपण पाहाल तर तेच तेच दिसायला लागतील. ही महाराष्ट्रातली सत्य परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षात एक तरी नवीन एफडीआय आलाय का. एक तरी नवा उद्योग महाराष्ट्रात आलाय का. वेदांता फॉक्सकॉन आम्ही प्रयत्न करत होतो. दावोस मध्येही भेटलो. सगळं झालं. जूनमध्ये सरकार पाडलं गेलं तोपर्यंत हा प्रकल्प तळेगावमध्ये येणार होते. एक लाख रोजगार निर्माण करणार होतं. सगळेच त्यासाठी झगडत होतो. सराकर पाडलं. मी जेव्हा सांगितलं की वेदांता फॉक्सकॉन गुजराताला गेलं तेव्हा मुंख्यमंत्री काय करत होते. एअरबस टाटा, बल्क ड्रग पार्क सगळं गुजरातला. टेस्ला, सबमरीन सगळं गुजरातला. महाराष्ट्रात आपण प्रत्येकत दिवस झगडत जगत असतो आणि यांचं महाराष्ट्र, मुंबई लुटायचं काम सुरू आहे. डायमंड बोर्स देखील गुजरातला गेला. हिरे व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या गेल्या आहेत. भाजपचे जे मित्र पक्ष आहेत, ईडी आयटी, सीबीआय तुमच्या ऑफिसमध्ये येतील, असे त्यांना धमकावले आहे. फायनॅन्स सेंटर गुजरातला. एअरबस टाटा गुजरातला. चाळीस गद्दार गुजरातला. सगळं गुजरातला” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”राज्याचे विधानसभा अध्यक्ष एकेकाळी आमचे मित्र होते. मग ते राष्ट्रवादीमध्ये गेले. मग भाजपमध्ये गेले. त्या अध्यक्ष महोदयांना सांगतोय ते ट्रायब्युनल बसले आहेत तुमच्याकडून अपेक्षित न्याय आहे. तो देखील आमच्या बाजूने लागेल असा अपेक्षित आहे. आम्ही न्याय मागतोय, कळकळीची विनंती. करतोय. ही लढाई फक्त शिवसेनेची नाही आमदारांची नाही महाराष्ट्राची आहे. ही लढाई अपात्रतेची नाही तर देशाच्या संविधानाची आहे. ज्या संविधानाप्रमाणे देश 75 वर्ष चालत आलेले आहेत. ते संविधान आज हे बदलायला निघाले आहेत. आज हेच अध्यक्ष महोदय सविंधान लोकशाहीच्या बाजूने राहिले तर 40 गद्दार बाद होणारच. आज या मतदारसंघानेही विचार करायचा आहे. जे जे मतदान करणार आहेत त्यांनी विचार करायचा आहे. तुम्ही ज्यांना मतदान केलं आहे त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही संविधानाच्या बाजूने राहाल की भाजपच्या बाजूने राहाल? असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मतदारांना केले आहे.

”आपल्या सर्वांना विभागलं गेलंय. जाती, धर्मावर विभागलं गेलंय. राज्य, शहर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं लावली आहेत. जेव्हा आपण भांडतो तेव्हा यांचे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर खोदायला लागतात. नक्की काय मिळवलंय यांनी दोन पक्ष फोडून. परिवार फोडले. जे जे सत्यासाठी लढतात. त्यांच्यावर तुम्ही धाडी टाकता. त्यांना त्रास देता. जे कुणी संघर्ष करता त्यांना हैराण करण्याचे प्रयत्न करतात. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलाय हजार कोटीचे घोटाळे केल्याचा आरोप करताय त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री करता. जे सामान्यांसोबत राहतात त्यांना का त्रास देतात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

”हे राजकीय पक्ष आपल्याला लढवत ठेवत आहेत. जे हजारो वर्षापूर्वी झालं असेल, शंभर वर्षापूर्वी झालं असेल त्यावर लढवत आहेत. भुतकाळावर आपल्याला लढवत ठेवत आहेत. तेव्हा जे झालं त्याचं आताशी काय घेणं देणं आहे. त्यावर भांडून आपल्याला काय मिळणार आहे. त्यामुळे आता भविष्यासाठी कोण लढतंय याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूला आपण पाहताय की मुंबई खोदलेली आहे. विकासाच्या नावावर प्रत्येक गल्ली खोदली जातेय. ज्या रस्त्याच्या घोटाळ्याविषयी मी 15 जानेवारी रोजी बोललो होतो. २०२३ च्या टेंडरमधला एक तरी नवीन रस्ता सुरू झाला आहे. सीएम म्हणजे करप्ट मॅन करप्ट मंत्री. हे मुख्यमंत्री महाराष्ट्र मुंबई चं वाटोळं करायला आले आहे. तुम्हाला लाज शरम तर नाहीच पण हिंमत देखील नाही निवडणूक लढवायची. पण जे सरकार चालवताय ते तरी व्यवस्थित चालवा’, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले.

”येणारं सरकार हे आपलं आहे. आपलं सरकार आल्यावर ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले आहेत ते तुरुंगात जाणारच. ही ओपन अँड शट केस आहे. कमिशनरला सांगतोय तुम्ही या घोटाळ्यात आहात. सावध रहा. 50 खोके 500 खोक्यांवर गेले आहेत. रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा आहे. तुमची आमची मुंबई विकायाला चालले आहेत. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यात दहा हजार कुंड्या विकत घेणार पण त्यात कुठली झाडं लावणार ते काहीही माहित नाही. टेंडर पास होत आहेत. पण कुणाला काहीही माहित नाही. सॅनिटरी पॅडचा घोटाळा. सरकार पाडून तुम्हाला काय मिळालं? आम्ही जी कामं केली त्याची उद्घाटनं तरी करा. इतके अकार्यक्षम मंत्री मी कधी पाहिले नव्हते. आताच्या तासाला देखील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होऊन तीन महिने झाले. तरी उद्घाटनाला वेळ मिळाला नाही. 250 रुपये टोल. बुलेट ट्रेनसाठी बीकेसीचा भुखंड फ्री. आणि इथे 250 रुपये टोल. का एवढा महाराष्ट्रावर अन्याय. आता 15 जानेवारी पर्यंत जर तुम्ही मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग सुरू केला नाही तर आम्ही जाऊन खुला करू’, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक रोड हे सगळं मुंबईत आहे त्यामुळे ते ऱखडवलं जातंय. जे काही हलवता येतंय ते दुसऱ्या राज्यात हलवातायत. म्हणजे इथलं सगळं नष्ट झालं की हे रस्ते सुरू करायला मोकळे. मग तुम्ही तिथे काहीही करा. माझा राग याच गोष्टीसाठी आहे. मुंबई गोवा महामार्ग किती वर्ष झाला रखडलाय. गेल्या दहा वर्षात आपण सतत ऐकतोय की आता पूर्ण होईल नंतर पूर्ण होईल. इतर राज्यांना चांगले रस्ते मिळत असतील तर माझ्या महाराष्ट्राला इतके खराब रस्ते का? नाशिकला एवढे खराब रस्ते आहेत. प्रत्येक आपला राष्ट्रीय महामार्ग आहे तो खराब आहे, असे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

”येणारं सरकार हे आपलं आहे. आपलं सरकार आल्यावर ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले आहेत ते तुरुंगात जाणारच. ही ओपन अँड शट केस आहे. कमिशनरला सांगतोय तुम्ही या घोटाळ्यात आहात. सावध रहा. 50 खोके 500 खोक्यांवर गेले आहेत. रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा आहे. तुमची आमची मुंबई विकायाला चालले आहेत. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यात दहा हजार कुंड्या विकत घेणार पण त्यात कुठली झाडं लावणार ते काहीही माहित नाही. टेंडर पास होत आहेत. पण कुणाला काहीही माहित नाही. सॅनिटरी पॅडचा घोटाळा. सरकार पाडून तुम्हाला काय मिळालं? आम्ही जी कामं केली त्याची उद्घाटनं तरी करा. इतके अकार्यक्षम मंत्री मी कधी पाहिले नव्हते. आताच्या तासाला देखील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होऊन तीन महिने झाले. तरी उद्घाटनाला वेळ मिळाला नाही. 250 रुपये टोल. बुलेट ट्रेनसाठी बीकेसीचा भुखंड फ्री. आणि इथे 250 रुपये टोल. का एवढा महाराष्ट्रावर अन्याय. आता 15 जानेवारी पर्यंत जर तुम्ही मुंबई ट्रान्स हार्बर मार्ग सुरू केला नाही तर आम्ही जाऊन खुला करू’, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.,

”महालक्ष्मीचा रेसकोर्स देखील बिल्डरांना विकायला निघाले आहे. पण आम्ही तुम्हाला मुंबई लुटू देणार आहात का ? दक्षिण मुंबईत एकमेव खुली जागा आहे ती 226 एकर मधून 90 एकर रेसिंग साठी देणार आणि इतर जागा सरकार बिल्डरच्या घशात घालणार. पण आम्ही या सरकारला सांगतो की या मोकळ्या जागेत एक विट देखील आम्ही लावू देणार नाही. या मोकळ्या जागेवर आमचे नागरिक योगा करतात, जॉगिंगला येतात. तुम्हाला रेसिंगसाठी जेवढी जागा हवी ती घ्या बाकीवर आम्हाला मैदान बनवून द्या, असे आदित्य ठाकरे यांनी सरकारला सुनावले.

”आज जी परिस्थिती मुंबईत आहे. ती बदलायची असेल तर तुम्हाला मराठी माणूस, मुंबई म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून विचार करावा लागेल. तुम्हााला कोणतं संविधान पाहिजे बाबासाहेबांनी लिहलेलं की यांनी तयार केलेलं. आपल्या संविधानासाठी आपल्याला देशात महाराष्ट्रात परिवर्तन आणायला लागेल. सध्या चिंता एकच आहे की लोकशाही टिकणार की नाही, संविधान राहणार की बदलणार. आपल्या राज्यात लोकशाही नष्ट केलेली आहे. 40 शहरात महपौर नाही. भ्रष्टाचाराचा कारभार सुरू आहे. उद्योगक्षेत्र कोलमडलं आहे. गावाकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाहीए. असं राज्य खूप दिवस टिकत नाही. महाराष्ट्राला सुवर्णकाळ परत आणायचं असेल तर आपल्याला एकवटायला लागेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हवे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

”आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे हृदयात राम आणि हाताला काम हे हिंदुत्व आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आपला देश वाचावायचा असेल तर आपल्याला प्रचारला लागावं लागेल. त्यासाठी मिंधे व भाजपांसारखं खोटं बोलायचं नाही पण जे खरं आहे ते कितीही कडू असू दे ते सांगायचं”, असे आदित्य यांनी जनतेला सांगितले.