अभिषेक घोसाळकर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक व उपनेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी अभिषेक यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला.

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास अभिषेक यांचे पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. यावेळी अभिषेक घोसाळकर यांची आई, पत्नी आणि मुलीने टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले. त

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.