शेतकऱयांना फसवणाऱया पिकविमा कंपनीला शिवसेनेचा दणका

चंद्रपूर जिह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पिक विमा काढल्याने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिह्यातील 47 हजार शेतकऱयांना 24 कोटी रूपये वितरित करणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने केवळ 11 हजार शेतकऱयांच्या खात्यावर केवळ 5 कोटी रूपये वितरीत केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कंपनीचे कार्यालय गाठून शिवसेना स्टाईलने आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कार्यालयातील खुर्च्या, संगणक, प्रिंटर, टेबलाची तोडपह्ड करीत कंपनीला चांगलाच दणका दिला.

जिह्यात चालू खरीप हंगामात सोयाबीन पिकावर किड व रोगाचा व्यापक प्रमाणात प्रादुर्भाव होवून पिकांचे नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तरतुदीतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखमेच्या बाबीअंतर्गत अधिसूचना लागू केली होती. त्यात 46 हजार 992 शेतकऩयांचा समावेश असून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने अग्रीमासाठी 23.80 कोटी रुपये मंजुर केले आहे. आतापर्यंत 11 हजार 277 शेतकऱयांना 4.94 कोटी रुपयाची रक्कम शेतकऱयांच्या खात्यात जमा केली आहे.सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱहे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी कंपनीचे कार्यालय गाठत पिकविम्यांचे पैसे अद्याप का दिले नाही? असा जाब विचारत कार्यालयातील साहित्यांची तोडपह्ड केली. यापुढे शेतकऱयांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असेही शिवसेनेने ठणकावले.