नेमप्लेट पळवून नेली तरी घर, छप्पर, जमीन आणि कार्यकर्ते शाबूत; संजय राऊत यांचा घणाघात

नाशिकमध्ये होणारे शिवसेनेचे अधिवेशन दिशादर्शक आहे. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अनेक घडामोडी घडल्या. काही चोर पक्षाचे नाव, दारावरची नेमप्लेट घेऊन पळून गेले. नेपप्लेट पळवून नेली तरी घर, छप्पर, जमीन आणि कार्यकर्ते शाबूत आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिध्यांवर केला. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. या पक्षाचे नेतृत्व 2013 नंतर पक्षप्रमुख म्हमऊन राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठरावानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. त्यांनी तो पक्ष पुढे नेला. भाजपने सत्ता, पैसा आणि दबाव यांच्या माध्यमातून पक्ष फोडला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना मंत्रीपदं, आमदारकी, खासदारकी दिली.

आज आमच्याकडे पक्षाचे अधिकृत नाव नाही, चिन्ह नाही. तरीही या पक्षाचे अधिवेशन त्याच नाशिकमध्ये होतंय जिथे बाळासाहेब ठाकरे यांनी घेतले होते. त्यात तोडीचे आणि ताकदीचे हे अधिवेशन होत आहे. पक्ष अजिबात बदललेला नाहीय. काही चोर होते, ते पक्षाचे नाव चोरून पळून गेले. दारावरची नेमप्लेट घेऊन पळून गेले बाकी काही नाही. असे नेमप्लेट पळून नेणारे चोर राजकारणात असतात, राष्ट्रवादीत आहेत, शिवसेनेतही निर्माण झाले. पण नेमप्लेट पळवली तरी घर, घराचे छप्पर, जमीन, कार्यकर्ते आणि सर्व माणसं शाबूत आहेत, असेही राऊत म्हणाले.

…म्हणून शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेवर आसाममध्ये हल्ला झाला. याचा संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध केला. संविधान वाचवण्यासाठी एका पक्षाचे नेते पदयात्रा काढत आहेत आणि ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे तिथे अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर देशातील लोकशाही धोक्यात आहे. ही हुकुमशाही आहे. या हल्ल्याचा शिवसेना निषेध करते. देशातील वातावरण बदलण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना नाशिकमध्ये अधिवेशन घेत असून हुकुमशाही उलथवून टाकण्याची सुरुवात नाशिकमधून करत आहोत, असेही राऊत म्हणाले.

‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे प्रदर्शन नागपुरात भरवू, फडणवीसांनी उद्घाटन करावं; राऊत यांचे आव्हान