स्वत:ची पोरं दाखवा; दुसऱयाच्या पोरांना तुमची नावं देऊ नका, संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काय आहे. त्यांच्या सातबाऱयावर रामाचं नाव लिहिलंय का? मोदींनी काय केलं? त्यांनी केलेली दहा कामे दाखवा. यूपीए सरकारच्या काळात केलेल्या कामांचे उद्घाटन करत ते फिरत आहेत. अटल सेतू काँग्रेसच्या काळातील आहे. स्वतःची पोरं दाखवा; दुसऱयांच्या पोरांना तुमची नावं देऊ नका,’ अशा शब्दांत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून सुरू असलेले पह्डापह्डीचे राजकारण तसेच यूपीए व महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामाच श्रेय घेण्यासाठी सुरू असलेली धडपड यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कार्यक्रमात भाजप व मिंधे सरकारवर सडकून टीका केली.

चिन्ह घेतलं म्हणजे तुम्ही बादशाह होत नाही. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी. कुणी ऐरागैरा येतो, पक्षावर- चिन्हावर दावा सांगतो, दरोडा टाकतो. त्या दरोडय़ाला निवडणूक आयोग मदत करतात. लोकांपर्यंत मशाल आणि तुतारी पोहोचली आहे. घडय़ाळ आणि धनुष्यबाणाचं काय करायचं हा प्रश्न आहे, असा टोला संजय राऊत यांनी मिंधे आणि अजित पवार गटाला लगावला. लोकसभेत भाजप 220 च्या पुढे जाणार नाही, असेही ते म्हणाले.