वरळी बीडीडी चाळींच्या जलद पुनर्वसनासाठी शिवसेना वचनबद्ध, आदित्य ठाकरे यांनी केलीप्रकल्पाची पाहणी

 मुंबईतील बीडीडी चाळींसाठी निश्चित धोरण तयार करून त्यानुसार, पुनर्विकास केला जात आहे, मात्र मध्यंतरी काही कारणांमुळे दोन वर्षे हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे हा प्रकल्प जगद गतीने पूर्ण व्हावा आणि रहिवाशांना त्यांच्या स्वप्नातील घर लवकर मिळावे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी आज वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱयांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बीडीडी रहिवाशांशी संवाद साधला. याबाबत सोशल मीडिया एक्सवर त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन येथील रहिवाशांना आपल्या हक्काच्या घरात लवकरात लवकर जाता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान, त्यांनी वरळीतील पावसाळय़ाच्या पूर्वतयारीचा आढावा आणि नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.