Sheikh Hasina News : सत्तांतरासाठी हसीना यांनी अमेरिकेला दोष दिलाच नाही, हसीना यांच्या मुलाने फेटाळले वृत्त

अमेरिकेमुळे बांगलादेशात सत्तांतर झाले असा आरोप माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी केला होता. पण वृत्त खोटं असल्याचे हसीना यांचे पुत्र साजिब वाजेद यांनी म्हटले आहे. हसीना यांनी ढाका सोडण्यापूर्वी किंवा नंतर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती असे वाजेद यांनी म्हटले आहे.

हसीना शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना बांगलादेशातली सत्तांतराला अमेरिकेला दोषी ठरवले होते. पण हसीना शेख यांचे पुत्र साजिब वाजेद यांनी हे वृत्त फेटाळले आहे. एक्सवर पोस्ट लिहून वाजेद यांनी म्हटले आहे की वृत्त पूर्णपणे खोटे आणि बनावट आहे. मी आताच आईशी बोलल असून त्यांनी असे कुठलेही विधान केलेले नाही.

यापूर्वी वृत्त आले होते की देश सोडण्यापूर्वी हसीना शेख राष्ट्राला उद्देशून एक भाषण करणार होत्या. पण पाच ऑगस्टला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना देश सोडून जावा लागला. न दिलेल्या भाषणात त्यांनी बांगलादेशातील सत्तांतराला अमेरिका कारणीभूत असल्याचे म्हटले होते. सेंट मार्टिन बेटासाठी आपल्यावर खुप दबाव होता, जर हे बेट आपण अमेरिकेला दिले असते तर आपण सत्ते राहिलो असतो असे हसीना यांनी म्हटले होते. पण त्यांचे पुत्र वाजेदने हे खोटं असल्याचं म्हटलं आहे.

बांगलादेश आणि अमेरिकेचे ताणलेले संबंध

शेख हसीना यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि बांगलादेशचे संबंध विकोपाला गेले होते. जानेवारीत झालेल्या निवडणुकीत आवामी लीग सत्तेवर आले होते ते स्वतंत्र आणि निष्पक्ष नाही असे अमेरिकेने म्हटले होते. पंतप्रधानपद सोडण्यापूर्वी आपले सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच बांगलादेश आणि म्यानमार वेगळा काढून एक नवीन ख्रिश्चन देश बनण्याचा एका गोऱ्या माणासाचा कट असल्याचे हसीना यांनी म्हटले होते.