गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी शरद पवार बिनविरोध, मात्र पॅनलचा मोठा पराभव

मुंबईच्या गरवारे क्लब व्यवस्थापनच्या निवडणुकीत यंदा मोठा फेरबदल झाला आहे. गरवारे क्लब हाऊस मॅनेजमेंट कमिटी निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. डायनॅमिक पॅनलनं इथं बाजी मारली आहे. डायनॅमिक पॅनलसाठी हा विजय मोठा विजय असण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागील 20 वर्षांपासून पवार यांच्या पॅनलचं वर्चस्व इथं पाहायला मिळालं होतं.

गरवारे क्लबच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली असली तरी त्यांचं पूर्ण पॅनल पराभूत झालं आहे. दक्षिण मुंबईत सर्वात मोठा क्लब आणि कोट्यवधींचा वार्षिक उलाढाल येथे होत असते. त्यामुळेच गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलच्या पराभव हा त्यांना धक्का मानला जात आहे. 13 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड झाली. मात्र, व्यवस्थान समितीत शरद पवार यांच्या पॅनलची एकही जागा निवडून आलेली नाही. तर डायनॅमिक पॅनलचे मनिष अजमेरा, मोहित चतुर्वेदी यांची रणनीती यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. डायनॅमिक पॅनलचे सायरस गोरिमार उपाध्यक्षपदी विराजमान होणार असल्याची माहिती मिळते.

विशेष म्हणजे पवार यांच्या पॅनलमध्ये भाजपचे माजी आमदार राज पुरोहित हेही उभे होते. त्यांनाही पराभव चाखावा लागला आहे. शरद पवार यांच्या पॅनलमध्ये भाजपचे माजी आमदार राज पुरोहित हेदेखील उभे होते. मात्र, त्यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.

या कल्बच्या व्यवस्थापन मंडळाच्या निवडणुकीत जवळपास 13 हजार सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत तीन दिवसात ऑनलाइन आणि प्रत्यक्ष पद्धतीनं मतदान झालं.