केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचं काम, शरद पवार यांचं भाजपवर शरसंधान

देशात सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रातील यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचे काम देखील करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. मात्र सत्तेचा गैरवापर करून शिवसेना सत्तेसाठी सोबत आलेल्या व्यक्तींकडे देण्यात आली आहे, तसंच काहीसं राष्ट्रवादी सोबत देखील झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर शरसंधान केले.

केंद्रात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षाने स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षातील नेत्यांविरोधात चौकशी केली आहे. आपल्या विरोधात दुसरा पर्याय उभा राहू नये याकरिता सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे, असा घणाघातही पवार यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.

भाजपने सत्तेचा बाजार मांडला, बिहारमध्ये पुन्हा फोडाफोडी; नितीश कुमार पलटी मारण्याच्या तयारीत

ते पुढे म्हणाले, आगामी काळात लोकसभा आणि त्या नंतर 4 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे आहे की पक्ष मजबूत केला पाहिजे, संघटना मजबूत केली पाहिजे. जर जोमाने काम केले तर आपण आगामी काळातील, महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)