रविवारी 53 व्या जीएसटी कौन्सिलची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचा एकही निर्णय घेतला गेला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. तसेच या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री या नात्याने अजित पवार उपस्थित राहिले नव्हते. त्यावरून शरद पवार यांच्या पक्षाने अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.
”केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक GST जमा करणारं महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. परंतु महाराष्ट्राच्या हिताचा प्राधान्याने एकही निर्णय 53 व्या जीएसटी कौन्सिल बैठकीत घेण्यात आलेला नाही. या देशातील बळीराजाच्या आणि कष्टकरी सर्वसामान्यांच्या हिताचा एकही निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला नाही. परंतु या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी सरकार 3.0 चं रेटून कौतुक करत आहेत. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या दिल्लीतील जीएसटी कौन्सिल बैठकीस उपस्थित राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडणं अपेक्षित होते, परंतु एरव्ही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत दिल्ली वाऱ्या करणाऱ्या अजित पवारांनी महत्त्वाच्या जीएसटी बैठकीस उपस्थित राहण्यास मात्र नापसंती दर्शवली. महायुती सरकारचा हा ढोंगीपणा महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही”, असा