शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला पाच महिन्यांनंतर मिळाली औषधे; रुग्ण कल्याण निधी मिळण्याचा मार्गही मोकळा

मिंधे सरकारने एप्रिलपासून रुग्ण कल्याण निधीच न दिल्याने शहापूरचे उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर गेल्याचे वृत्त दैनक ‘सामना’तून प्रसिद्ध होताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. बातमीची दखल घेत दुसऱ्याच दिवशी आवश्यक औषधांचा साठा शहापूर उपजिल्हा रुग्णालयाला पाठवण्यात आला. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. शिवाय तातडीने रुग्ण कल्याण निधी वर्ग केला जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हिपॅटायटीस बी व सी, डेंग्यू चाचणी किट, लहान बाळांसाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा आहे. याशिवाय एप्रिलपासून रुग्ण कल्याण निधी थकवल्याने साफसफाईसाठी लागणाऱ्या वस्तू, शवविच्छेदनासाठी लागणारे साहित्य, रुग्णवाहिकांसाठी इंधन, स्टेशनरी, कार्यालयीन खर्च कसा करायचा याची चिंता प्रशासनाला आहे. उधारीवरील औषधांची सात लाखांवर थकबाकी आहे. विशेष म्हणजे केसपेपरची उधारीवर छपाई करावी लागत आहे. जागे झाले.

केसपेपरचा पुरवठा करणार दैनिक सामना ‘सामना’ बातमीची दखल प्रभाव घेऊन जिल्हा प्रशासनाने आज औषधांचा साठा रुग्णालयाला पाठवला. यामध्ये बालकांची औषधे, हिपॅटायटीस बी व सी, डेंग्यू चाचणी किट, सीबीसी काऊंटसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. याशिवाय तातडीने केसपेपरचा पुरवठादेखील करण्यात येणार असून रुग्णालयीन खर्च, साफसफाई व शवविच्छेदनासाठी लागणारे साहित्य यासाठी लवकरच निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.