Share Market news – शेअर बाजार सुस्साट… सेन्सेक्स, निफ्टीनं घडवला नवा इतिहास, गुंतवणूकदार मालामाल

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक या मध्यवर्ती बँकेने व्याज दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय हिंदुस्थानसह जगभरातील शेअर बाजाराच्या पथ्यावर पडला आहे. अमेरिकेपासून जपानपर्यंत शेअर बाजारात तेजी दिसून येत असून हिंदुस्थानच्या शेअर बाजारानेही नवा इतिहास घडवला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने नवीन उच्चांक गाठला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.

शुक्रवारी बाजार उघडताच तेजी दिसून आली. सेन्सेक्स 1000 अंकांनी उसळला आणि 84200 वर पोहोचला. निफ्टीमध्येही तेजी दिसून आली असून 300 अंकांच्या वाढीसह तो 25720 वर पोहोचला. शेअर बाजाराचा हा उच्चांक आहे. अर्थात त्यानंतर उच्चांक गाठल्यानंतर बाजारात थोडी घसरण झाली.

America Federal Reserve Bank ची व्याजदरात कपात; आता RBI कर्जदारांना दिलासा देणार काय…

दरम्यान, अनेक शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. कोचीन शिपयार्डचा शेअर जवळपास 10 टक्के उसळला आहे. यासह आयआयएफएलचा शेअर 10 टक्के, राइट्सचा शेअर 8 टक्के, बीएसईचा शेअर 9 टक्के, माझगाव डॉकचा शेअर 7 टक्के, क्रॅकोटेक देवचा शेअर 5 टक्के, महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 4 टक्के, झोमॅटोचा शेअर 4 टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर 3.75 टक्के, कोल इंडियाचा शेअर 3.70 टक्के, आयशर मोटरचा शेअर 3.50 टक्के वाढला आहे.