शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 2303 अंकांनी, तर निफ्टी 736 अंकांनी वधारला

शेअर बाजारातील बुधवारचा दिवस गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासादायक ठरला. बीएसई सेन्सेक्स 2303 अंकांनी वधारून 74,382 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 736 अंकांच्या वाढीसह 22,620 अंकांवर बंद झाला. लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने शेअर बाजार मंगळवारी जोरदार आपटला होता, परंतु बुधवारी सावरल्याचे आशादायी चित्र दिसले. बुधवारी शेअर बाजार बंपर वेगाने निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स 4 टक्के आणि निफ्टी बँक 4.5 टक्क्यांनी मजबुतीसह बंद झाला.

गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटींचे नुकसान
लोकसभा निवडणुकीच्या दिवशी शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्समध्ये पाच हजारांहून जास्त अंकांची घसरण झाली, तर निफ्टी 1600 अंकांनी घसरला होता. यामुळे जवळपास 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. परंतु आज गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला

अदानींच्या दोन शेअर्समध्ये घसरण
गौतम अदानी ग्रुप यांच्या दहा लिस्टेड पंपन्यांपैकी दोन शेअर तोटय़ात बंद झाले. तर अन्य आठ शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर जवळपास 11 टक्क्यांच्या मजबुतींसह बंद झाले. नाल्को, पतंजली, देवयानी, सेल, फेडरल बँक, अशोक लेलॅण्ड, हिंदुस्थान जिंक, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुथुट फायनान्सचे शेअर्स वधारले.

हे शेअर्स फायद्यात
अदानी पोर्ट्स, इंडस्इंड बँक,
टाटा स्टील, महिंद्रा हीरो
मोटोकॉर्प, हिंदाल्को आणि अदानी इंटरप्रायझेस हे शेअर्स वधारले आहेत.

हे शेअर्स तोटय़ात
डायनॉमिक्स, जीआरएसई, कोचीन शिपयार्ड, टिटागड वेगंस, डेटा पेटर्न्स इंडिया, स्टर्लिंग विल्सन सोलर, पेटीएमचे शेअर्स घसरले.