यशाने कीर्ती जशी मिळते तसेच अपयशाने अपमानितसुद्धा व्हावे लागते. महिला टी-20 क्रिकेट कर्ल्ड कपमध्ये सुमार कामगिरीमुळे हिंदुस्थानी संघाचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. बलाढय़ संघ असूनही साखळी सामन्यांमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने यासाठी तातडीची बैठक बोलाकली असून या बैठकीत खेळाडूंच्या कामगिरीचे पोस्टमॉर्टम होणार असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाला निरोप देण्याच्या हालचालींनाही वेग आल्याची सुत्रांची माहिती आहे.
हिंदुस्थानी महिला संघाला यापूर्वीच्या अनेक स्पर्धांमध्येही बाद फेरी गाठता आलेली नाही. टी-20 कर्ल्ड कपमधील अतिशय सामान्य कामगिरीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ‘बीसीसीआय’ लककरच मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि निवड समितीसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत कर्णधार म्हणून हरमनप्रीतच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल.
टी-20 कर्ल्ड कप संपल्यानंतर न्यूझीलंडचा महिला संघ एकदिकसीय मालिकेसाठी हिंदुस्थान दौऱयावर जाणार आहे. या मालिकेसाठी 24 ऑक्टोबरला हिंदुस्थानी संघ निवडला जाणार आहे. कदाचित, यावेळी हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदावरही निर्णय घेतला जाऊ शकतो. तिला कर्णधारपदाकरून हटवून स्मृती मानधना किंवा एखाद्या युवा खेळाडूकडे हिंदुस्थानी संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी मायदेशात होणाऱया वन डे कर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला कर्णधारपदात बदल हवा आहे.
हरमनप्रीत 2016पासून कर्णधार
हरमनप्रीत कौरला 2016 मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले होते. तिच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी महिला संघाने अनेकवेळा बाद फेरी गाठली आहे, मात्र प्रत्येक वेळी त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. 2020 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आणि बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल स्पर्धेच्या फायनलमध्येही हिंदुस्थानी महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा आशिया चषक स्पर्धेतही महिला संघाचा पराभव झाला. सततच्या अपयशानंतर बीसीसीआय नेतृत्व बदलाबाबत गंभीर असून न्यूझीलंड मालिकेपूर्वी हे दिसून येऊ शकते.
युवा खेळाडूकडे नेतृत्व सोपविण्याची वेळ!
हिंदुस्थानची माजी कर्णधार मिताली राजने महिला संघाच्या कामगिरीवर आणि कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. हरमनप्रीत कौरच्या जागी संघाचे नेतृत्व आता एखाद्या युवा खेळाडूकडे सोपवण्याची वेळ आली आहे, असे तिने स्पष्टपणे म्हटले आहे. ‘जर संघ निवड समितीने आता वेळ न घालविता कर्णधार बदल करण्याचा निर्णय घ्यायला हवा. कारण आगामी कर्ल्ड कपही अगदी जवळ आला आहे, असेही मितालीने सांगितले.